यावर्षी 34 कंपन्यांचे 34 हजार कोटींचे आयपीओ येण्याची शक्यता, सेबीकडून मंजुरी

 

स्थैर्य, सातारा, दि.५: शेअर बाजार कोरोना संकटामुळे आलेल्या मोठ्या घसरणीतून सावरला आहे. परिणामी आता कंपन्यांना प्राथमिक समभाग विक्रीच्या(आयपीओ) माध्यमातून गुंतवणूक मिळण्याची आशा आहे. ३४ कंपन्यांना यावर्षी आयपीओ आणण्यास मंजुरी मिळाली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, बाजार नियामक सेबीकडून या ३४ कंपन्यांना सुमारे ३३,५१६ कोटी रुपयांचे आयपीओ आणण्यास मंजुरी मिळाली आहे. यापैकी ७ कंपन्यांना लॉकडाऊनमध्ये मंजुरी मिळाली आहे. या सात कंपन्या नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज, स्टोव्ह क्राफ्ट(रिफाइंड), यूटीआय एएमसी, बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटी, लखिठा इन्फ्रास्ट्रक्चर, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि हॅप्पीस्ट माइंड्स आहेत. सप्टेंबरमध्ये हॅप्पीस्ट माइंड्सला ७०२ कोटी रुपयांचा आयपीओ लिस्ट होईल. यासोबत एंजेल ब्रोकिंग, सीएएमएस आणि यूटीआय एएमसीचा आयपीओही सप्टेंबरमध्ये येऊ शकतो. दुसरीकडे, नुकतेच आणखी तीन कंपन्यांनी आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे. जयकुमार कन्स्ट्रक्शन, ग्लँड फॉर्मा आणि कल्याण ज्वेलर्सने सेबीकडे मंजुरीसाठी कागदपत्रे जमा केले आहेत. तिघांचे आयपीओ सुमारे १८७५ कोटी रुपयांचे असतील. अर्थव्यवस्थेवर सरकारच्या पॅकेजचा परिणाम झाला आहे.

कोरोनात सहा महिन्यांची सूट

नियमानुसार, सेबीच्या मंजुरीनंतर कंपनीला एका वर्षाच्या आत आयपीओ लाँच करावा लागतो. मात्र, कोरोना संकटामुळे सेबीने एप्रिल- २०२० मध्ये ६ महिन्यांची आणखी सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता एका पाठोपाठ एक कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

गेल्यावर्षी ११ कंपन्यांनी आणला होता, यावर्षी आतापर्यंत ३ कंपन्यांनी आणला आयपीओ

अनलॉकनंतर अलीकडच्या महिन्यांत बेंचमार्क निर्देशांकात वेगाने वाढ झाली आहे. आतापर्यंत तीन कंपन्यांनी आयपीओ लाँच केला. गेल्यावर्षी या अवधीत ११ कंपन्यांनी पब्लिक इश्यू आणला होता. मार्चमध्ये एसबीआय कार्ड्‌स अँड पेमेंट सर्व्हिसेस १०,००० कोटी रुपये तर जूनमध्ये रोझारी बायोटेकने ५०० कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. रोझारीने ७९ पट जास्त सब्सक्रिप्शन प्राप्त करून चकीत केले होते. माइंडस्पेस बिझनेस पार्क आरईआयटीने जुलैमध्ये ४,५०० कोटी रु. जमा केले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.