म्हसवड शहरात आणखी ५ नवीन रुग्णांची भरस्थैर्य, म्हसवड, दि. १३ : म्हसवड शहरात कोरोनाने सर्वच चित्र पालटले असुन दररोज कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने म्हसवड शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे, तर या शहरातील बाधितांची संख्या ही ३०० च्या पुढे गेली असुन दि १२ रोजी शहरात नवीन ५ बाधितांची भर पडली आहे. तर एकजणाचा दुर्देवी अंत झाला आहे.


म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करीत असले तरी कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती आणखी घट्ट बनु लागली आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. शहरात ज्याप्रमाणे नवीन रुग्ण सापडत आहेत त्याप्रमाणेच मृत्यु ही वाढु लागल्याने नागरीकांचे डोके सुन्न होवु लागले आहे. म्हसवड शहरात दि. १२ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार येथील गुरव गल्ली येथील ४४ वर्षीय पुरुष, व १९ वर्षीय युवक, मेनरोड येथील ३९ वर्षीय पुरुष, व येथील केवटे मळा येथील ३० वर्षीय पुरुष, व २३ वर्षीय महिला आदींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान म्हसवड शहरातील एकाचा दि. १२ रोजी सातारा सिव्हील येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला असुन गत ४ दिवसांपासुन त्याच्यावर सातारा येथे सरकारी रुग्णालयात कोव्हीड अंतर्गत उपचार सुरु होते. 


म्हसवड शहरात कोरोना बाधीतांनी ओलांडला ३०० चा आकडा 

म्हसवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असुन आजअखेर शहरातील ३०५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर यापैकी १९३ जणांची कोरोनामुक्ती झाली असुन अद्यापही ११२ रुग्ण हे अँक्टीव्ह आहेत तर आजवर शहरातील ९ जणांना या कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.


Previous Post Next Post