विदेशात पाठवल्या जाणाऱ्या पैशावर 1 ऑक्टोबरपासून 5% कर

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: रिझर्व्ह बँकेच्या पैसे पाठवण्याच्या योजनेअंतर्गत विदेशात पैसे पाठवल्यास ५ टक्के दराने टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (टीसीएस) लागेल. हा कर १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याची तरतूद वित्त अधिनियम २०२० मध्ये केली आहे. सरकारने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ओव्हरसीज रेमिटन्स आणि ओव्हरसीज टूर पॅकेजच्या विक्रीवर ५ टक्के टीसीएस लावण्यासाठी कलम २०६ सीमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला होता.

२७ मार्चला अधिसूचित केलेल्या वित्त अधिनियमात या तरतुदी लागू करण्यासाठी १ ऑक्टोबर तारीख निश्चित केली आहे. अनेक वित्त संस्थांनी आपल्या ग्राहकांना १ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या टीसीएस तरतुदीची माहिती पाठवली आहे.
Previous Post Next Post