कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदकुमार भोईटे यांच्याकडून ऑक्सिजनचे ५० बेड


स्थैर्य, फलटण : कै. शामराव भोईटे यांच्या स्मरणार्थ फलटण नगर परिषदेचे उपनराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी फलटण शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळण्यासाठी रुपये ५ लाख रुपयांचा धनादेश उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या कडे सुपूर्त केला. 


कै. शामराव भोईटे यांच्या स्मरणार्थ फलटण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी दिलेल्या ५ लाख रुपयांचा निधी मधून फलटण शहर व तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी 50 बेड्सना ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे.

 

उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी केलेल्या मदतीबद्दल प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सहाय्यक निबंधक धायगुडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी आभार मानले. 

Previous Post Next Post