500 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 807 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

स्थैर्य, सातारा दि.२२: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 500 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 807 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

807 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26,उपजिल्हा रुग्णालय कराड 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 65, कोरेगाव 117, वाई 109, खंडाळा 51, रायगांव 118, पानमळेवाडी 86, मायणी 33, महाबळेश्वर 50, दहिवडी 39 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 97 असे एकूण 807 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

आतापर्यंत 45,538 रुग्णांची ॲन्टिजन (RAT) तपासणी

तसेच सातारा जिल्ह्यात विविध शासकीय व खाजगी तपासणी केंद्रात आतापर्यंत आरएटी (RAT) साठी 48,538 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, यापैकी 12,600 रुगणंचा अहवाल पॉझिटिव्ह तर 35,938 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --113178

एकूण बाधित -- 31514 

घरी सोडण्यात आलेले --- 21625 

मृत्यू -- 940

उपचारार्थ रुग्ण --8949