डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने फलटणमध्ये कोरोनासाठी ६ बेड्स


स्थैर्य, फलटण : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने कोरोनासाठी ६ बेड्स देण्यात आलेले आहेत. यामध्ये ६ बेड्स, गाद्या, उशी, बेडशीट्स असा समावेश आहे. उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे 6 बेड्सचा संपूर्ण संच सुपूर्द करण्यात आलेला आहे. 


यावेळी जेष्ठ नेते मधुकर काकडे, नगरसेवक सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, बहुजन चॅनलचे संपादक सनी काकडे, जयंती समितीचे माजी अध्यक्ष शाम अहिवळे, संजय गायकवाड तसेच सन २०२०चे जयंती समितीचे प्रमुख शिवेंद्रराज कांबळे, बंटी साबळे, सम्राट अहिवळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


कोरोना बाधितांना फलटण येथे असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये किंवा विलीगीकरण कक्षात बेड मिळत नाहीत. कोरोना बाधितांना उपचार न मिळता आपला जीव गमवावा लागणार नाही. यासाठी सर्वानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती फलटणच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Previous Post Next Post