‘अ‍ॅट्रोसीटी’ची धमकी देऊन 8.40 लाखाची खंडणी उकळली

 


सातारा येथील एकास अटक : शाहूपुरी पोलिसांची कारवाई 


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : अ‍ॅट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून साडेआठ लाख खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी सातारा येथील एकास अटक केली आहे. चंद्रकांत दादासो साठे वय 25 रा. शाहू बोर्डिंगजवळ, व्यंकटपुरा पेठ, सातारा असे संशयीताचे नाव आहे. 


याबाबत माहिती अशी, शंकरराव गुलाबराव निंबाळकर रा. गडकर आळी शाहुपूरी सातारा हे 2015 पासून कोटेश्‍वर मंदिरात भजनासाठी जातात. तेथे चंद्रकांत दादासो साठे हा ढोलकी वाजवण्यास यायचा. त्याच्याशी शंकराव निंबाळकर यांची ओळख झाली. 2018 मध्ये साठे याने शंकरराव निंबाळकर यांना भाजी विक्रीच्या व्यवसायासाठी 3 लाख मागितले. निंबाळकर यांनी ते देण्यास नकार दिला. परंतु. संशयीत साठे याने पैसे दिले नाहीत तर तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली. खोटा गुन्हा नोंद होण्याचे भितीपोटी निंबाळकर यांनी आरोपीस रोख स्वरूपात 3 लाख रुपये दिले. 

त्यानंतरही आरोपीने वेळोवेळी निंबाळकर यांना खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तसेच निंबाळकर व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, तसेच करवीर पोलीस ठाण्यात खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, तो माघारी घेण्यासाठी पैशाची मागणी केली.


फिर्यादी निंबाळकर यांची सामाजिक पत धोक्यात आणणेची भिती घालून त्यांच्याकडुन साठे याने आजपर्यंत 8 लाख 40 हजार रोख स्वरुपात घेतलेले आहेत. तसेच दि. 4 सप्टेंबर रोजी पुन्हा 2 लाखांची मागणी केली आहे. या तगाद्याला वैतागून अखेर फिर्यादी निंबाळकर यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयीत साठे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मार्गदर्शन केल्यानुसार शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, सपोनि संदीप शितोळे, गुन्हे प्रकरटीकरण विभागाचे , पो.हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, मोहन पवार, पंकज मोहिते,  सुनिल मोहरे यांनी संशयीताचा शोध घेवून त्यास अटक केली. याप्रकरणी  याप्रकरणी सपोनि संदीप शितोळे तपास करत आहेत.


Previous Post Next Post