875 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 985 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 


स्थैर्य, सातारा दि.२१: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 875 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 985 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

985 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 54,उपजिल्हा रुग्णालय कराड 26, उपजिल्हा रुग्णालय फलटण 46, कोरेगाव 82, वाई 141, खंडाळा 82, रायगांव 98, पानमळेवाडी 40, मायणी 53, महाबळेश्वर 30, पाटण 27, दहिवडी 64, तळमावले 35 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 207 असे एकूण 985 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --63833

एकूण बाधित -- 30824 

घरी सोडण्यात आलेले --- 21125 

मृत्यू -- 906

उपचारार्थ रुग्ण --8793