जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

 


स्थैर्य, वाठार स्टेशन, दि.२०: जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात लगडवाडी ता. वाई येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बनवडी ता.कोरेगाव येथील गणेश सखाराम गायकवाड यांनी लगडवाडी ता. वाई येथील बाळू पवार यांच्या घराचे काम घेतले होते परंतु ते मुदतीत झाले नसल्याने मध्यस्थ असणारे दिलीप शेलार यांनी गणेश गायकवाड यांच्या राहत्या घरी बनवडी येथे जावून पत्नी माधवी व गणेश गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ केली व गणेश गायकवाड यांच्याकडे असणारे शिवाजी चौधरी यांना मारहाण केली व जोरजोराने शिवीगाळ केली यावर सामाजिक कार्यकर्ते दलित पँथरचे विश्वास मोरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व गरीब कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी जिल्हापोलीस अधीक्षक व वाठार स्टेशन स.पो.नि स्वप्नील घोंगडे यांना निवेदन दिली आहेत.