पती-पत्नीस फरशीचा तुकडा मारून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 

स्थैर्य, नागठाणे, दि.२८: डिपीवरिल स्ट्रीट लाईटच्या भांडणाच्या कारणावरून नागठाणे (ता.सातारा) येथील हिराई गोल्डन सीटी येथे पती-पत्नीस फरशीचा तुकडा मारून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत संशयित वैभव दिलीप पवार, दिलीप वसंत पवार, वैष्णवी दिलीप पवार, वैभव यांचे मामा, वैभव यांची मामी, वैभव यांची आजी (पूर्ण नाव माहीत नाही. सर्व रा. हिराई गोल्डन सीटी नागठाणे ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सुनील सुदाम ढाकणे (मुळ रा. दत्तनगर ता.शिरूर कासार जि.बीड, सध्या रा.हिराई गोल्डन सीटी नागठाणे ता.सातारा) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
 
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनील ढाकणे यांच्या घरासमोरील खांबावरील बल्ब गेल्याने डिपीवरिल स्ट्रीट लाईट बंद करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात संशयित वैभव पवार यांने सुनील ढाकणे यांच्या दोन कानाखाली मारून घराचे गॅलरीतून फरशीचा तुकडा फिर्यादीची पत्नीच्या डोक्यात मारून जखमी केले.यावेळी संशयितांनी हाताने, लाथाबुक्यानी मारहाण केली. या घटनेत संशयित वैभव पवार व वैष्णवी पवार यांनी फिर्यादी व फिर्यादीची पत्नीस तुमची मुलगी किडनॅप करीन, तुम्हाला येथे राहून देणार नाही, तुम्ही बाहेरून आला आहे. तुमच्या टु व्हीलर, फोर व्हीलर गाड्या पेटवून देईन अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबतचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अधिक तपास पोलिस नाईक राजू शिंदे करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya