पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून मारहाण चौघांवर गुन्हा दाखल 

 

स्थैर्य, सातारा, दि.२०: लिंब, ता. सातारा येथे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून दोन महिलांसह चौघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, लिंब गावातील पाटील गल्लीमध्ये महेश किसन सावंत, किसन शंकर सावंत, पुष्पा किसन सावंत सर्व रा. विठ्ठलवाडी, लिंब हे तिघे फिर्यादी कोमल सावंत यांचा भाऊ अक्षय यास पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या कारणावरून मारहाण करत होते. त्याला सोडवण्यासाठी कोमल सावंत, त्यांची आई व लहान भाऊ गणेश गेले. यावेळी तिघा संशयितांनी त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी किसन सावंत यांनी धारदार शस्त्राने कोमल सावंत यांच्या हातावर वार केले व सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार बागवान तपास करत आहेत.