विनयभंग प्रकरणी वेणेगावच्या एकावर गुन्हा दाखलस्थैर्य, नागठाणे, दि. 11 : शिवारात काम करत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वेणेगाव (ता.सातारा) येथील एकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयूर माधव सावंत (रा. वेणेगाव, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.


याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी गावलगतच्या मळावी शिवारातील ओढ्याच्या काठ्यावर असलेल्या निरगुडीच्या झाडाच्या फांद्या तोडत असतानाच अचानक संशयित मयूर माधव सावंत तेथे आला. त्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. अचानक घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने आरडाओरडा केल्याने संशयित तेथून पळून गेला. पीडितेने घडलेली घटना कुटुंबियांस सांगितली. मात्र, यावेळी गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्यांना बाहेर पडता न आल्याने ते तक्रार देऊ शकले नाही. अखेर गुरुवारी सायंकाळी पीडित महिलेने याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. या घटनेचा पुढील तपास हवालदार बाजीराव पायमल करत आहेत.


Previous Post Next Post