दुर्घटना : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला पहाटे भीषण आग, येथे 15 अतिगंभीर कोरोना रुग्णांवर सुरू होते उपचार

 

स्थैर्य, कोल्हापूर, दि.२८: कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमध्ये ही आग लागली. सीपीआरच्या या विभागात कोरोनाच्या अतिगंभीर 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. सुदैवाने या कक्षातील 15 रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आले. केवळ एका रुग्णाचा हात भाजला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी दिली आहे. दरम्यान आगीत काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

आग लागल्याची माहिती मिळताच सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांनी येथील कोरोना रुग्णांना अपघात विभागात हलवले. तसेच तातडीने घटनास्थळी महापालिका अग्नाीशामक दलाचा बंब पोहचला अणि तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. पंधरा रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya