कृतीशील दातृवाच पुढच पाऊलकरोना विरूध्दच्या लढाईसाठी मदनदादांच्या कुटुंबियांकडून १0 ऑक्सीजन किट


स्थैर्य, भुईंज, दि. २६ : सध्या कोरोना बाधित सध्या कोरोना बाधित रुग्णांची अपुऱ्या सुविधांमुळे परवड सुरु आहे. डॉक्टर व आरोग्य सेवक आपल्यापरीने प्रत्येक रुग्णाची श्‍वास वाचविण्यासाठी धडपडत आहेत. या धडपडीला बळ देण्यासाठी किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले व त्यांच्या कुटुंबियांनी १0 ऑक्सिजन किट विनामोबदला उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोनाच्या लढाईत मदनदादा भोसले व डॉ.सो.निलिमा भोसले पहिल्या दिवसापासून जे कृतिशील योगदान देत आहेत. त्यामध्ये या उपक्रमाने दिलासादायी पुढच पाऊल टाकल आहे. 


कोरोनाच्या सुरुवातीपासून मदनदादा भोसले यांनी आरोग्य विभाग, कोरोनाविरुध्द लढणारे प्रशासन, पोलीस यांना हॅण्ड सॅनिटायझर मोठ्याप्रमाणावर उपलब्ध केले. डॉ.सो.निलिमा भोसले यांनी बाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्‍यांतील सर्व आशा स्वयंसेविकांना हॅण्ड सॅनिटायझर मास्क, हॅण्ड ग्लोज जागेवर नेऊन दिले. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सो. सुरभि भोसले-चव्हाण यांनी ऑक्सिमीटरसोबत हॅण्ड सॅनिटायझर, गुडूची टॅबलेट मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करुन दिल्या. केतनदादा भोसले यांनीही अशाच प्रकारे गरजूंपर्यत आवश्यक ती मदत पोहोचविली. या संपूर्ण कुटूंबाने अशाप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत एल्गार छेडला असताना वाई शहरात ऑक्सिजन किटची आवश्यकता लक्षात घेऊन कुटंबियांतर्फे तब्बल १0 ऑक्सिजन किट विनामोबदला दिले. या किटचे वितरण व व्यवस्थापन श्री.मदनदादा भोसले मित्रसमूहातर्फे करणेत येणार आहे. त्यासाठी मदनदादा भोसले, डॉ.सो.निलिमा भोसले, डॉ.सो.सुरभि भोसले-चव्हाण यांचे हस्ते हे किट प्रा.डॉ.नितिन कदम यांचेकडे सुपूर्द करणेत आले. यावेळी उद्योजक सुदिप भट्ट्ड यांनी या ऑक्सिजन किट वापरासंदर्भातील माहिती उपस्थितांना दिली. या ऑक्सिजन किटसाठी प्रा.डॉ.नितिन कदम, घन:शाम चक्के यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.


यावेळी मदनदादा भोसले यांचे बंधू मोहनराव भोसले, पुतणे यश भोसले, उद्योजक मोहन सारडा, वाई नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सतिश वैराट, नगरसेवक महेंद्र धनवे, अजित वनारसे, प्रशांत नागपूरकर, सचिन जमदाडे, संतोष जमदाडे, एन.एन. काळोखे आदि मान्यवर उपस्थित होते.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya