म्हसवड शहरात आणखी ५ नव्या रुग्णांची वाढ

 


स्थैर्य, म्हसवड दि. ६ : म्हसवड शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा २५० च्या घरात पोहचलेला असताना आज दि. ६ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार शहरातील आणखी ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


दि. ६ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार म्हसवड शहरातील ५ जणांना बाधा झाली असुन यामध्ये भगवान गल्ली येथील ६३ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील ६५ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरुष, माळी गल्ली येथील ५० वर्षीय पुरुष, व शिक्षक कॉलनी येथील ५० वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे. 


कोरोनाचा आकडा दररोज वाढु लागल्याने म्हसवडकरांच्या काळजात अक्षरशा धडकी भरली आहे. तर म्हसवड शहर हे कोरोनामुक्त व्हावे याकरीता प्रशासनाने याठिकाणी लॉकडाउन सुरु केला असला तरी रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने म्हसवडकरांची चिंता वाढली आहे.


Previous Post Next Post