'आदित्य ठाकरे यांची ड्रग्ज चाचणी व्हावी'; भाजप नेते निलेश राणेंची मागणी

 


स्थैर्य, मुंबई, दि.३: सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर अनेकांचे नाव समोर येत असून, या प्रकरणाला वेगळच वळण लागलं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर याप्रकरणावरुन अनेकांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनोटने बॉलिवूडमधील अनेकांची ड्रग्ज टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी तर थेट शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.

राणेंनी ट्वीटमध्येलिहीले की, 'फक्त रणवीर-रणबीर यांनीच का, आदित्य ठाकरे यांनीदेखील ड्रग्ज चाचणी करावी. कारण, तेही बॉलिवूडमधील अनेकांच्या संपर्कात असतात,' असे ट्वीट निलेश राणेंनी केले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya