ऑगस्टमध्ये अल्टो ची जबरदस्त मागणी, मारुतीच्या कार विक्रीत 17% वाढ

 


स्थैर्य, दि.१: अनलॉक कालावधी दरम्यान मारुती सुझुकीची कार विक्री पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत आहे. कंपनीच्या मिनी कार अल्टो
 आणि वॅगन आर च्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
ऑगस्टमध्ये विक्री 17.1 टक्क्यांनी वाढली
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये वाहनांची विक्री 17.1 टक्क्यांनी वाढून 1,24,624 वाहनांवर पोहोचली आहे.वर्षभरापूर्वी 
याच महिन्यात कंपनीने 1,06,413 वाहनांची विक्री केली होती. ऑगस्टमध्ये स्थानिक बाजारात मारुतीच्या कारची विक्री 20.2 
टक्क्यांनी वाढून 1,16,704 वाहनांवर गेली आहे. जी ऑगस्ट 2019 मध्ये ते 97,061 युनिट्स इतकी होती.
अल्टो च्या मागणीत प्रचंड वाढ
ऑगस्ट महिन्यात मारुतीच्या मिनी कार अल्टो आणि वॅगन आरची विक्री 94.7 टक्क्यांनी वाढून 19,709 वाहनांवर पोहोचली. 
जी ऑगस्ट 2019 मध्ये ते 10,123 युनिट्स इतकी होती. त्याचप्रमाणे कॉम्पॅक्ट प्रकारात स्विफ्ट, Celerio , Ignis, Baleno 
आणि dzire यांची विक्री 14.2 टक्क्यांनी वाढून 61,956 वाहनांवर गेली. जी ऑगस्ट 2019 मध्ये 54,274 युनिट्स इतकी होती.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.