अमिताभ यांचा मोठा निर्णय : बिग बी करणार अवयवदान

 


स्थैर्य, मुंबई, दि.३०: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी उशीरा रात्री त्यांनी आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. बिग बींनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हिरवी फित लावलेला एक फोटोदेखील यासह शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.... याचे पावित्र्य दर्शवण्यासाठी ही हिरवी फित लावली आहे."

दररोज 15 तास काम करत आहेत

अमिताभ यांनी बुधवारी सकाळी एका ट्विटमध्ये सांगितले की, ते पेंगोलिन मास्क घालून कामावर जात असून दररोज 15 तास काम करतात. या ट्विटसह त्यांनी स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे. अमिताभ सध्या केबीसीच्या नव्या सीझनमध्ये दिसत आहेत.

सोशल मीडियावर होत आहे बिग बींचे कौतुक

अमिताभ यांच्या अवयवदान करण्याच्या निर्णयाचे सोशल मीडिया यूजर्सनी कौतुक केले आहे. अनेकांनी आपली प्रमाणपत्रे शेअर करुन अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली असल्याचे त्यांना सांगितले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya