हद्दवाढीत समावेश झाल्याने आकाशवाणी येथे आनंदोत्सव

 


स्थैर्य, सातारा, दि.१२: सातारा शहराच्या हद्दवाढीमध्ये त्रिशंकू भागातील आकाशवाणी झोपडपट्टीचा समावेश झाला. हद्दवाढ मंजूर करुन त्रिशंकू भागाला विकासाची कवाडे खुली करुन दिल्याबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अभिनंदन करत आकाशवाणी येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हद्दवाढ मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानन्यात आले. 

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रलंबीत प्रश्‍न सोडवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शहरासह त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग खुला केला. आकाशवाणी झोपडपट्टी हा भाग सुध्दा त्रिशंकूमध्ये मोडत होता. मात्र आता हा भाग हद्दवाढीत समाविष्ट असल्याने पालिकेच्या अखत्यारीत येणार आहे. त्यामुळे आमच्याही भागात विकासकामे होतील. याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानतो, असे आकाशवाणी झोपडपट्टी येथील सचिन कांबळे यांनी म्हटले आणि आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सचिन कांबळे यांच्यासह रविंद्र बाबर, अस्लम शेख, अमोल जानराव, अश्‍विन भिसे, रविंद्र शेडगे, अनिल पिसाळ, बापू भोरे, मिलींद कांबळे, नागेश पडवळ, शोभा बाबर, सुजाता भोरे, रेखा पिसाळ, सुप्रिया जानराव, शितल बाबर, ममता पवार, अर्चना कांबळे, सुनिता शेडगे यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya