व्यवसायासाठी सर्वाधिक सवलती देणाऱ्या राज्यांत आंध्र प्रदेश अव्वल, यूपी दुसऱ्या तर महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर


स्थैर्य, सातारा, दि.६: केंद्राने शनिवारी स्टेट बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लॅन-२०१९ (बीएआरपी) क्रमवारी जाहीर केली. यात भारताला स्वावलंबी करण्यासाठी व्यवसायातील सुधारणा प्रक्रियेत देशातील राज्य सरकारे काय प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही क्रमवारी जाहीर केली. यात आंध्र प्रदेश तिसऱ्यांदा अव्वल, तर महाराष्ट्र १३ व्या स्थानी आहे.

बीआरपीची ही चौथी क्रमवारी आहे. २०१२ मध्ये १२व्या स्थानी असलेले उत्तर प्रदेश यंदा दुसऱ्या स्थानी असून तेलंगण दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानी आले आहे. व्यावसायिक सुधारणा लागू करण्याच्या दृष्टीने आंध्र व उत्तर प्रदेश सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरले. यंदाची ही क्रमवारी पूर्णपणे युजर्स फीडबॅकच्या आधारे दिली आहे. विविध १८० निकषांच्या आधारे ३५ हजारांहून अधिक फीडबॅक घेऊन ही क्रमवारी जाहीर झाली. हा निकाल मार्चमध्येच जाहीर केला जाणार होता. परंतु, कोरोना महामारीमुळे यास सहा महिने विलंब झाला. यंदा राज्यांना विभागनिहाय क्रमवारी देण्यात आली आहे.देशाच्या व्यवसाय सुलभतेच्या रँकिंगमध्ये सुधारणा होईल

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडने २०१५ मध्ये राज्यांत व्यापारी सुधारणांसाठी कृती आराखडा तयार केला होता. जेणेकरून राज्यांचे या दिशेने मूल्यांकन करून त्यांची तुलना करता येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, राज्यांत रँकिंगच्या स्पर्धेमुळे देशाच्या एकूण व्यवसाय सुलभता रँकिंगमध्येही सुधारणा होईल.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.