कमी वयात दुग्ध व्यवसायात अनिकेत जाधव यांचे उज्ज्वल यश


स्थैर्य, फलटण : सन २०१९ मध्ये आठ देशी गाई अनिकेत जाधव यांनी विकत घेतल्या व दुग्ध व्यवसायाला सुरवात केली, आठ गाईच्या मिळालेल्या नफ्यातून पाच गाई विकत घेतल्या. दुग्ध व्यवसायसोबतच गाईचे तुप, ताक, गोमुत्र, शेणखत उत्पादन तयार केले. सध्या चालू वर्षी त्यांच्याकडे 25 गाई असुन त्यांना दरमहा चाळीस हजार खर्च आहे. हा खर्च जाऊन त्यांना दरमहा एक लाख नफा राहत आहे. सुरुवातीला सदर गाईचा गोठा हा 5 गुंठे जागे मध्ये असून गोठा उभारण्यासाठी आणि गाई खरेदीसाठी अंदाजे रक्कम 10 लाख खर्च झालेला आहे. अनिकेत जाधव-पाटील हे त्यांच्या गाईसाठी सेंद्रीय व आयुर्वेदीक खाद्य देतात. त्यामूळे निरोगी राहतात. गाईवर कोणत्याही प्रकारचे रासायनिक उपचार केले जात नाहीत. देशी गाईना विदेशी गाईंपेक्षा 50 % खाद्य कमी लागते, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, कृषी महाविद्यालय, पुणे अंतर्गत कृषी कन्या नेहा रोहिदास थोरात यांनी फलटण येथे कृषी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


या कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या नेहा रोहिदास थोरात हिने अनिकेत सुरेश जाधव पाटील यांच्या कमी वयात यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला. दररोज दुध उत्पन 32 लिटर एवढे आहे व 90 रुपये लिटरने दुध विक्री केले जाते. दुधा बरोबरच तुपाचे उत्पादान वैदिक पध्दतीने केले जाते व तुपाला, ताकाला या पदार्थांना भरपूर मागणी आहे. तसेच ते त्यांच्या कामगार वर्गाची व ग्राहकांची चांगल्या पद्धतीने काळजी ते घेत असतात. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे त्यांनी या व्यवसायात चांगले यश संपादन केलेले आहे. सदर गाईचा गोठा 25 वरुन 100 गाई पर्यंत एक वर्षामध्ये वाढविण्याचा संकल्प अनिकेत जाधव-पाटील यांचा आहे. या प्रोजेक्ट साठी नेहा रोहिदास थोरात हिला डॉ. एच. पी. सोनवणे, केंद्रप्रमुख डॉ. आर. डी. बनसोड, कार्यक्रम अधिकरी डॉ. एस. एस. शिंदे व अभियांत्रिक विभागाचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya