लंडनच्या कोर्टात अनिल अंबानी यांची कबुली : 'दागिने विकून वकिलांची फी भरली, माझ्याकडे रोल्स रॉयस कार नाही ; कुटुंबीयय माझा खर्च उचलतात'

 

स्थैर्य, दि.२६: कर्जबाजारी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी लंडनच्या एका कोर्टात शुक्रवारी सांगितले की, ते साधे जीवन जगत आहेत. तसेच, त्यांच्याकडे कोणतीही रोल्स रॉयस कार नाही आणि दागिने विकून वकिलांची फी देत आहेत. चीनच्या तीन सरकारी बँकोंकडून कर्ज घेतल्याप्रकरणी अनिल अंबानी पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे लंडन हाय कोर्टात सामील झाले होते.

9.9 कोटी रुपयांचे दागिने विकले

अनिल अंबानी यांनी सांगितले की, जानेवारी ते जून 2020 दरम्यान घरातील दागिने विकून त्यांनी 9.9 कोटी रुपये जमा केले. आता त्यांच्याकडे स्वतःची अशी मोठी कोणतीच संपत्ती नाही. त्यांच्याकडे अनेक कार्स असलेल्या प्रश्नावर अनिल अंबानी म्हणाले की, माध्यमांनी पसरवलेल्या या बातम्यांना काहीच तथ्य नाही. त्यांच्याकडे कोणतीच रॉल्स रॉयस कार नाही. सध्या त्यांच्याकडे फक्त एक कार आहे. तसेच, सध्या त्यांचे कुटुंबीय त्यांचा खर्च उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोर्टाने आणि मुलाकडून घेतलेल्या कर्जावर विचारला प्रश्न

शुक्रवारी सुनावणीदरम्यान कोर्टाने लग्जरी दुकानांवर क्रेडिट कार्डने केलेल्या खर्चावर प्रश्न विचारला. यावर अनिल अंबानी म्हणाले की, या क्रेडिट कार्डवर त्यांची आई कोकिलाबेन अंबानी खर्च करतात. आईकडून 66 मिलियन डॉलर आणि मुलाकडून 41 मिलियन डॉलरच्या कर्जावर अनिल अंबानी म्हणाले की, या कर्जाच्या अटीची माहिती देऊ शकत नाही. पण, हे कर्ज भेट स्वरुपाचे नाही. यादरम्यान अंबानी यांनी कोर्टात सांगितले की, कधीकाळी ते भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत होते. पण, आता त्यांच्याकडे फक्त 1,10,000 डॉलरची एक पेंटींग उरली आहे.

काय आहे प्रकरण ?

अनिल अंबानींची कंपनी रिलायंस कम्युनिकेशन (आरकॉम) ने चीनच्या तीन सरकारी बँकांकडून कॉरपोरेट लोन घेतले होते. पण, आरकॉम हे कर्ज फेडू शकली नाही. चीनी बँकांचे म्हणने आहे की, या कर्जासाठी अनिल यांनी पर्सनल गॅरंटी दिली होती. अनिल अंबानी यांच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी बँकांनी लंडनच्या कोर्टात खटला दाखल केला.

हायकोर्टाने 22 मे रोजी 5,281 कोटी रुपये फेडण्याचे आदेश दिले होते

याप्रकरणी लंडनच्या हायकोर्टाने 22 मे 2020 ला अनिल अंबानी यांना चीनी बँकांचे 71 कोटी डॉलर( 528) कोटी रुपये फेडण्याचे आदेश दिले होते. यासोबतच कायदेशीर खर्च म्हणून सुमारे 7 कोटी रुपयेही देण्यास सांगितेल होते. ही परतफेड 12 जून 2020 पर्यंत करायची होती. पण, अनिल अंबानी हे पैसे फेडू शकले नाही. 15 जूनला चीनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीचा खुलासा करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

या चीनी बँकांकडून घेतले होते कर्ज

इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (आयसीबीसी) ची मुंबई शाखा

चायना डेवलपमेंट बँक

एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ चायना
Previous Post Next Post