अनिल माळी यांची भाजपा जिल्हा सचिवपदी निवड

 


स्थैर्य, कातरखटाव, (प्रतिनिधी) : वडूज येथील विद्यमान नगरसेवक व माजी सरपंच अनिल तुकाराम माळी यांची  भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा सचिवपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.


या निवडीबद्दल त्यांचे खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ.शिवेंद्रसिंह भोसले, संपर्क प्रमुख सदाभाऊ खाडे आदिंसह मान्यवरांनी अभिनंदन केले.


माळी हे सद्या नगरपंचायती च्या बांधकाम सभापती पदावरही काम करत आहेत. वडूज शहर परिसरातील नागरीकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्याबरोबर दुष्काळ, टंचाई परस्थितीत विविध मोर्चे आंदोलने करण्याबरोबर प्रसंगी पदरमोडही करण्यात ते मागेपुढे पाहत नाहीत. अश्या तळमळीच्या कार्यकर्त्याला जिल्हा पातळीवर पक्ष संघटनेत स्थान दिल्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya