कंगनाला बीएमसीची आणखी एक नोटीस


स्थैर्य, मुंबई, दि.१४: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर नुकताच मुंबई महापालिकेने हातोडा चालवला. पालिकेच्या या कारवाईनंतर कंगना व शिवसेना यांच्यातील वाद टीपेला पोहोचला आहे. कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर कंगना चवताळली आहे. शिवसेना आणि ठाकरे सरकारवर सतत टीका करत आहे. अशात मुंबई पालिकेने कंगनाला आणखी एक जोरदार झटका देण्याची तयारी चालवली आहे. पालिकेने आता कंगनाच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामावरून नोटीस बजावली आहे. 

मुंबईताल खार पश्चिममध्ये एका बिल्डिंगमध्ये कंगनाचा एक फ्लॅट आहे. या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. पाचव्या मजल्यावर कंगनाचे एक नाही तर तीन फ्लॅट आहेत. हे तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. ८ मार्च २०१३ रोजी तिन्ही फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले होते. कंगनाने फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १३ मार्च २०१८ रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिने फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचे तक्रारीत म्हटले होते. 

या तक्रारीनंतर २६ मार्च २०१८ रोजी बीएमसीच्या अधिका-यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला नुसार नोटीस बजावण्यात आली होती. आता कंगनाला याप्रकरणी नव्याने नोटीस बजावली आहे. बीएमसीच्या दाव्यानुसार, कंगनाच्या कार्यालयाच्या तुलनेत फ्लॅटमधील बांधकाम हे अधिक गंभीर आहे़ तिने अक्षरश: नियमांची पायमल्ली केली आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.