मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणारा जेरबंद

 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे भासवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा अखेर जेरबंद झाला आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कोलकात्यातून एकाला अटक केली. ४९ वर्षीय आरोपी हा कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती आहे.

आरोपीचे वकील अनिर्बन गुहा यांनी दावा केला की, आपल्या अशिलाला अडकवण्यासाठी त्याचा आयपी अ‍ॅड्रेस हॅक करुन व्हीओआयपी कॉल करण्यात आला असावा. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून मुंबई पोलिसांना आरोपीची चार दिवसांची कोठडी दिली आहे.
Previous Post Next Post