केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या जाधव प्रथम

 


स्थैर्य, सातारा, दि. १३ : सातारा जिल्हा परिषद आयोजित 'Thanks to Teacher' अभियानांतर्गत ऑनलाईन घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बसाप्पाची वाडी ता.जी. सातारा येथील कु. आर्या विक्रम जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. 


आरळे केंद्रस्तरीय ऑनलाईन  वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसाप्पाचीवाडी येथे इ. ७ वि मध्ये शिकणाऱ्या  आर्या जाधव हिने माझे आवडते शिक्षक या विषयावर अतिशय  आत्मविश्वासपूर्वक भाषण सादर करुन बसाप्पाचीवाडी शाळेचे नांव उंचावले. तिची तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली. आर्याचे वर्गशिक्षक प्रविण क्षीरसागर यांचे मार्गदर्शन तिला लाभले. शाळेचे मुख्याध्यापक माने, केंद्रप्रमुख भुरकुंडे,  शिक्षण विस्ताराधिकारी सौ. गुरव  आणि गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्यासह बसाप्पाचीवाडी गावचे सरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी आर्याचे अभिनंदन केले.Previous Post Next Post