आर्या वृंदावन रहिवाशांची  बिल्डरच्या विरोधात निदर्शने

 

स्थैर्य, सातारा, दि.२२: आर्या डेव्हलपर्सने बांधलेल्या आर्या वृंदावन अपार्टमेंटमध्ये बिल्डरने आश्वासन दिल्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने फ्लॅटधारकांची फसवणूक झाली आहे. याबाबत जाब विचारला असता दमदाटी केली जात आहे. संबंधित बिल्डर्सविरोधात कारवाई न झाल्याने फ्लॅटधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी निदर्शने केली .

दहा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे ५६ फ्लॅटधारकांनी तक्रार केली होती. आर्या वृंदावन हा प्रकल्प विद्या दिग्वीजय गायकवाड आणि त्यांचे पती दिग्वीजय आनंदराव गायकवाड यांचा आहे. या बिल्डर दाखवलेल्या अमिषास बळी पडून अनेक फ्लॅटधारकांनी पैसे साठवून, कर्ज काढून फ्लॅट घेतले आहेत. फ्लॅटधारकांकडून ठरल्यापेक्षा लाखो रुपये जादा उकळण्यात आले. खरेदीप्रमाणे व्यवहार खरेदीपत्र करुन देण्यास, सोसायटी स्थापन करण्यास, लाईफटाईम मेंटनन्ससाठी गोळा केलेली रक्कम हडप करण्याचा प्रयत्न टेरेस, पार्किंग, प्रकल्पातील सार्वजनिक जागा त्रयस्त व्यक्तीस विक्रीचा प्रयत्न सुरु आहे. 

गायकवाड पती-पत्नीने फ्लॅटधारकांना दिलेली आश्वासने, सोई-सुविधा तसेच व्यवहाराची पूर्तता करुन देण्यास चालढकल केली जात आहे. त्यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याने कायदेशीर नोटीस देवून जाब विचारला. गायकवाड यांनी फ्लॅटधारकांना खोट्या कारवाईत अडकवण्याची धमकी दिली. याबाबत संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी फ्लॅटधारकांनी केली होती. त्याबाबत अद्यापही कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले .
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya