अशोक घाडगे यांना पी. एच. डी

 

स्थैर्य, ललगुण (ता. खटाव), दि.२१: येथील सुपुत्र व पुणे येथील बालग्राम एस.एस.ओ. चिल्ड्रन्स व्हिलेजेस महाराष्ट्र चे कार्यकारी संचालक अशोक परशुराम घाडगे यांना समाजकार्य विषयात पुणे विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनाथ मुलांचे सामाजिकरण व पुनर्वसनासाठी बालग्राम संस्थानच्या योगदानाचा अभ्यास या विषयावर त्यांनी विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. जी. आर. राठोड, डॉ. व्ही.व्ही. कुलकर्णी, डॉ. एस. कुंभार, डॉ. सुर्यवंशी आदिंचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. श्री. घाडगे यांनी एम. एस. डब्ल्यू. पदवी घेतल्यानंतर गेली 30 वर्षे बालग्राम मधील शेकडो अनाथ निराधार मुलांची काळजी घेण्याबरोबर त्यांचे संरक्षण करुन योग्य प्रकारे पुनर्वसन केले आहे. स्वत: कन्यादान करुन 35 हुन अधिक मुलींचे विवाह लावून दिले आहेत. यापूर्वीही 2010 मध्ये त्यांनी समाजशास्त्र विषयात एम. फिल ची पदवी प्राप्त केली होती.

डॉ. घाडगे हे ललगुण वि.का.स.सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रवीण घाडगे यांचे बंधू आहेत. पी. एच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे ललगुण परिसरातील मान्यवरांसह खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरीकांनी अभिनंदन केले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya