हॉटेल फोडून चोरीचा प्रयत्न


 

स्थैर्य, सातारा, दि. 4 : सदर बझार येथील एक हॉटेल चोरट्यांनी फोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फिलीप जॉन भांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गणेश हरिभाऊ गायकवाड रा. सदर बझार आणि कश्मिरा संदीप पवार रा. कोयना सोसायटी यांनी फिलीप भांबळे यांच्या सदर बझार येथील हॉटेल फूड जंक्शन रॉयल पामची तोडफोड करून हॉटेलमध्ये चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास हवालदार मोहिते करत आहेत.


Previous Post Next Post