हेट स्पीच वादाचा परिणाम:अल्पसंख्याकांवर कमेंट केल्यामुळे भाजप आमदार टी राजा यांना फेसबुकने केले बॅन


स्थैर्य, हायद्राबाद, दि.३: हेट स्पीच प्रकरणी वाद वाढल्यानंतर फेसबुकने तेलंगाणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांना फेसबुकवर बॅन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार फेसबुकने म्हटले की, "आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे हिंसा आणि नकारात्मकता थांबवण्यासाठी आखण्यात आलेल्या पॉलिसीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली."

टी राजा यांना इंस्टाग्रामवरही बॅन केले

फेसबुकचे म्हणने आहे की, आमच्या पॉलिसीविरोधात जाणाऱ्या यूजरच्या तपासाचा परीघ खूप मोठा आहे. त्यामुळेच आम्ही आमदार टी राजाविरोधात कारवाई केली. राजा यांच्या फेसबुकसोबतच इंस्टाग्रामलाही बॅन करण्यात आले आहे. अल्पसंख्यांकांवर कमेंट केल्याविरोधात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

मागच्या महिन्यात अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, भारतात फेसबुकचे अधिकारी भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित ग्रुप्सवर हेट स्पीचचे नियम लागू करत नाहीत. यानंतर काँग्रेसने म्हटले होते की, फेसबुक आणि भाजपचे संगनमत आहे. भाजपने पलटवार करत काँग्रेस आणि फेसबुकचे संगनमत असल्याचे आरोप लावले होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya