मुंबईच्या महापौरांविरोधात भाजपचा अविश्वास प्रस्ताव

 

स्थैर्य, मुंबई, दि.११: शिवसेना विरुद्ध भाजपमधला वाद वाढताना दिसत आहे. भाजपने आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. भाजपचे नगरसेवक आणि गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव सादर केला. त्यासाठी महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३६ (ह) अन्वये तातडीची सभा घेऊन त्यात मुंबई महापौरांवर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची चर्चा करण्यासाठी महापौरांनी त्वरित प्रत्यक्ष बैठक लावावी अशी विनंती भाजपने पत्राद्वारे केली आहे.

कोरोना रोखण्यात मुंबई पालिका अपयशी ठरली आहे. आरोग्य व्यवस्था अपुरी आहे. मुंबई पालिकेतील सत्तापक्ष उदासीन आहे, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. ‘भोजन से कफन तक’ आशा नावाखाली महापालिकेत भ्रष्टाचार सुरु आहे. याला वाचा फुटू नये म्हणून महापौरांनी मागच्या ६ महिन्यात एकही बैठक घेतली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेही बैठक घेतली नाही, असंही प्रभाकर शिंदे म्हणाले.

सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांनी हातात हात घालून भ्रष्टाचार केला. आमची बांधिलकी मुंबईकरांसोबत आहे. वाटण्यात आलेल्या खिचडीचा दर ४० रुपये होते. एनजीओचा दर १५ रुपये होता. प्रेताच्या कव्हर बॅग पालिकेने ६७०० रुपयांना विकल्या. आम्ही पत्र पाठवली, आंदोलने देखील केली.

मुंबईतील कोरोना रुग्ण लुटीच्या उंबरठ्यावर आहे. आम्ही नेहमी यावर संघर्ष करत राहिलो, पण महापौरांनी एकही बैठक घेतली नाही. ३६ ह अन्वये मुंबई महापौरांवर अविश्वास ठराव दाखल केला आहे. स्थायी समितीची सभा लावली असताना महापौरांनी ती रद्द केली, असा हल्लाबोल प्रभाकर शिंदे यांनी केला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya