जिल्हा बँकेच्या पगार तारण कर्ज योजनेचा लाभ घ्या : मुळ्ये

 

रमजान इनामदार यांचा सत्कार करताना विठ्ठल मुळ्ये, शेजारी राजेंद्र बागल, प्रवीण गारळे सचिन खाडे आदी. (छाया : समीर तांबोळी)

स्थैर्य, कातरखटाव, दि. १० : खास नोकरदारांना आपल्या  अडचणीवर मात करता यावी या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत सुरू करण्यात आलेल्या पगार तारण कर्ज योजनेचा  लाभ घ्यावा असे आवाहन शाखा प्रमुख विठ्ठल मुळ्ये यांनी केले.


मायणी (ता.खटाव ) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी रोखपाल सचिन खाडे, राजेंद्र बागल, प्रविन गारळे,शुभम साखरे, चैतन्य बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.


मुळ्ये म्हणाले की, शासनाच्या विविध योजना थेट बांधा पर्यंत पोचवण्याचे काम बँकेच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकरी हित पाहत असताना  शासकीय नोकरदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी बँकेने पगार तारण कर्ज सुरू केले आहे.यामुळे  नोकरदारांना अडचणींवर मात करता येणार आहे. याशिवाय सॅलरी पॅकेज ग्रहसंकल्प,शिक्षणीक कर्ज एटीएम,विमा,मोबाइल बँकिंग आदी बाबत ही माहिती देण्यात आली.


यावेळी आबासाहेब देशमुख,प्रा.डी आर. महामुनी, गणेश गुरव, रमजान इनामदार,संजय काळे,जावेद इनामदार,मृगेंद्र शिंदे,रुपाली गुरव,यास्मिन शेख,रंजना सानप,उदय गुरव , प्रमोद निकम आदींसह शिक्षक उपस्थित होते.


राजेंद्र बागल यांनी आभार मानले.

    


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya