भारतीय जनता पक्षाच्या कार्याची तळागाळात जनजागृती करणार - धनंजय चव्हाण

 


स्थैर्य, खटाव, दि.१४: महाभयंकर कोरोना विषाणू संसर्गाचा काळ सुरू असून जनतेच्या मनातील कोरो ना ची भीती कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या "आत्मनिर्भर भारत" अभियानाच्या माध्यमातून तळागाळात जनजागृती करण्यात येणार असल्याचे भाजप चे नूतन खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.यावेळी भाजप माजी तालुका अध्यक्ष विकल्प शहा, भाजप जिल्हा सचिव व नगरसेवक अनिल माळी, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी जयवंत पाटील,प्रधानमंत्री जनकल्याण समिती चे तालुका अध्यक्ष प्रा अजय शेटे,नगरसेवक वचन शहा,डॉ प्रशांत गोडसे,अजित सिंहासने,विशाल बागल,वडूज शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल साबळे,स्नेहल कुलकर्णीआदींची उपस्थिती होती.

येत्या गुरुवारी १७सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने "सेवा सप्ताहाचे"आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वडूज येथील ओंकार मंगल कार्यालयात तालुका भाजप कार्यकर्त्यांनी एक बैठक आयोजित केली होती. सेवा सप्ताहात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, रक्तदान, आरोग्य शिबिर, प्लाझ्मा दान,दिव्यांग अवयव वाटप,आत्म निर्भर भारत जनजागृती आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध ठिकाणी ७० रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. लोकांच्या घरी जाऊन ऑक्सिजन मीटर द्वारे ऑक्सिजन तपासणी तसेच प्लाझ्मा दान करण्यासंबंधी आवाहन, गरजू दिव्यांग लोकांची यादी करण्यात येऊन चष्मे,काठी आदींचे वाटप केले जाणार असून गरजुनी भाजप च्या कार्यालयात किंवा पदाधिकारी यांचेकडे संपर्क साधण्याचे आवाहन धनंजय चव्हाण यांनी या वेळी केले.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन चंद्रकांत कोकाटे यांनी केले, प्रास्तविक विकल्प शहा यांनी तर अमोल साबळे यांनी आभार मानले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya