कास पठारावर विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी दोघांना दंड


स्थैर्य, सातारा, दि.२१: कास पठारावर कोरोनाच्रा प्रदुभावामुळे पर्रटकांना बंदी असतानाही काही पर्रटक कास पठारवर रेत असुन ते फुलांमध्रे विनापरवानगी प्रवेश करत असल्राने त्रांच्रावर वन समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली असुन रविवारी दोन जणांवर कारवाई करत त्रांच्राकडुन 1000 रूपरे दंड वसुल केला आहे.

जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठार हे नैसर्गीकरंगीबेरंगी रानफुलानी बहरले असून काही पर्रटकाना कोरोनाच्रा महामारीतही पर्रटनस्थळे बंद असतानाही नैसर्गिक फुलांचा आनंद लुटण्राचा मोह आवरेनासा झाला असुन अनेक पर्रटक कास पठारकडे धाव घेऊ लागले आहेत. त्रामुळे सुट्टीच्रा दिवशी कासरोडवर वाहनाची वर्दळ वाढल्राचे दिसुन रेत असुन काही पर्रटक रोडवरूनच फुलांचा आनंद लुटत आहेत. तर काही पर्रटक कुंपन जाळीच्रा खालुन फुलाच्रा राखीव क्षेत्रात बेकारदेशीर प्रवेश करत आहेत.

कोरोनामुळे शासनाने पर्रटन बंदी कारम ठेवली असल्राने वनसमातीने रावर्षीचा फुलाचा हंगाम पर्रटकांसाठी बंद ठेवल्राचे जाहीर करत पर्रटकांनी कास पठारावर रेवू नरे, असे अवाहन करून तसेच सूचना फलक लावुनही अनेक पर्रटक कास पवारवर दाखल होत आहेत. ते कुंपनाच्रा आत फुलांच्या परिसरामध्रे बेकारदेशीर प्रवेश करत असल्राने वनविभागाच्रा सुचनेनुसार वनसमितीने कारवाईची मोहीम हाती घेतली असुन रविवारी कुंपनाच्रा आत फुलांमध्रे प्रवेश करणार्‍या दोन सातारमधील पर्रटकांवर कारवाई करत प्रत्रेकी 500 रुपरे दंड वसुल केला जाहे. कास पठारावर कोणीही पर्रटनासाठी रेऊ नरे व फुलामध्रे बेकारदेशीर प्रवेश करू नरे. अन्रथा कारवाई केली जाईल, असे वनसमिती कर्मचारी पदाधीकार्‍यांनी आवाहन केले आहे.