हद्दवाढीमुळे शहरासह उपनगरांचाही विकास झपाट्याने होईल

 


आ. शिवेंद्रसिंहराजे; पालिकेच्या आजी, माजी नगरसेवकांनी केला सत्कार


स्थैर्य, सातारा, दि. ११ : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबीत आणि रखडेलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर अथक पाठपुराव्यातून मंजूर करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा पालिकेच्या आजी, माजी नगरसेवकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, हद्दवाढ मंजूर झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असून सातारा शहरासह, त्रिशंकू भागाचा आणि शहरालगतच्या उपनगरांचा झपाट्याने विकास होईल, असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. 


शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळेल. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर होणे अत्यावश्यक होते आणि त्यासाठीच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या अभ्यासपुर्ण पाठपुराव्यामुळे चालू अधिवेशनात सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला. दरम्यान, यानिमीत्त आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा आजी, माजी नगरसेवक, त्रिशंकू भागातील नागरिक आणि उपनगरातील नागरिकांनी सत्कार करुन आभार मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने, पक्षप्रतोद अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे पाटील, अविनाश कदम, धनंजय जांभळे, रवी ढोणे, विजय काटवटे, सौ. लिना गोरे, सौ. मनिषा काळोखे, सौ. दीपलक्ष्मी नाईक, सौ. प्राची शहाणे, सौ. सोनाली नलवडे, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, सचिन सारस, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, जगन्नाथ किर्दत, राजू गोरे, किशोर पंडीत, अशोक जाधव, अतुल चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, महेश महामुनी, रणजित साळुंखे, सुनिल जाधव, अभिजित उबाळे, रवी माने, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, ॲड. प्रशांत खामकर, विठ्ठल बलशेटवार, चंदन घोडके, राहूल शिवनामे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.    


गेल्या अनेक वर्षांपासून हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत होता. यामुळे सातारा शहराच्या आणि आसपासच्या उपनगरांच्या, त्रिशंकू भागाच्या विकासावर दुरोगामी परिणाम होत आहे. त्यामुळे एक जनहिताची बाब म्हणून सातारा शहराच्या हद्दवाढीस तातडीने मंजूरी मिळून मुलभूत सोयी- सुविधांपासून वंचीत राहणार्‍या उपनगरे व त्रिशंकू भागातील नागरिकांना दिलासा मिळावा, पालिकेच्या उत्पन्नात वाढ होवून शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, मोठमोठी विकासकामे मार्गी लागावीत यासाठी हद्दवाढ होणे गरजेचे होते. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि हा प्रश्‍न मार्गी लावला. आगामी काळात औद्योगिकीरण आणि रोजगार निर्मीतीसाठी प्राधान्य देवून सातारची एमआयडीसी वाढवण्याकडे लक्ष देणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya