'बंटी और बबली 2':कोरोना काळात संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत पूर्ण झाले चित्रपटाचे चित्रीकरण, सैफ अली खान म्हणाला- आम्हाला घरापेक्षा सेटवर जास्त सुरक्षित वाटले

 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: कोरोना काळात फक्त अक्षय कुमारच शूटिंग करत नाही तर इतर कलाकारदेखील शूटिंग करत आहेत. ते आपले अर्धवट राहिलेली शूटिंग पूर्ण करत आहेत. यात सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरीने 'बंटी और बबली 2'चे शूटिंग पूर्ण केली. ही शूटिंग कुठे बाहेर नव्हे तर स्टुडिओच्या आत करण्यात आली. कोरोना काळात ही शूटिंग झाली. त्यामुळे यशराज फिल्म्सने सुरक्षिततेची चांगली व्यवस्था केली होती. त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. प्रॉडक्शन हाऊसने प्रत्येकाची तपासणी केली. सेटवर 24 तास मेडिकल स्टाफ हजर होता. टीमने पूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांना शूटच्या आधीच विलगीकरण कक्षात ठेवले होते. जेणकरुन कोरोना संसर्ग होऊ नये आणि शूटिंगमध्ये अडथळा येऊ नये.

यशराज फिल्म्सने केली हॉटेलपर्यंत जाण्या-येण्याची व्यवस्था

चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण शर्मा सांगतात, आम्ही सेटवर सुरक्षित वातावरण देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शिवाय सरकारच्या सर्व गाइडलाइन्सचा नियम पाळला. त्यामुळे 'बंटी और बबली 2'च्या सेटवर काहीच घडले नाही. सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. कलाकारांबरोबरच सर्वांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर क्रू मेंबर्सला हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले होते, जेणेकरुन ते सुरक्षित राहतील. काही कलाकार घरीच राहिले आणि शूटिंगदरम्यान कुणाला भेटले नाहीत. हॉटेल ते सेटवर जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यातही चालकांची तपासणी करण्यात आली. सर्व काही सुरक्षित पार पडले. सेटवर कुणालाच संसर्ग झाला नाही. त्यामुळे आता इंडस्ट्री पुन्हा कामाला लागेल असे वाटते.

सैफ अली खान - सेटवर खूप चांगली व्यवस्था होती

शूटिंगदरम्यानचा आपला अनुभव सांगताना अभिनेता सैफ अली खान म्हणाला, हा एक अतिशय संवेदनशील काळ आहे आणि जोखीम लक्षात घेता प्रत्येकाने अधिक जागरुक राहण्याची गरज आहे आणि आम्ही तेच केले. सेटवर सुरक्षितता असते, तेव्हा काम करण्याची मजाही येते. आम्हाला शूटिंगची चांगला अनुभव मिळाला. यशराजची व्यवस्था पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. खरे सांगायचे झाले तर घरांपेक्षा सेटवर आम्हाला ब-याच वेळा सुरक्षित वाटले. इतर निर्मात्यांनीही अशी काळजी घ्यावी, असे मला वाटते.

राणी मुखर्जीने केले सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक

आम्ही कोरोना काळात शूटिंग पूर्ण केले. कारण आम्हाला सुरक्षित वाटत होते. आम्ही याचाही आनंद घेतला. आमच्याकडे जेव्हा जेव्हा वेळ असायचा. तेव्हा आम्ही कोरोनापूर्वीच्या शूटिंगविषयी बोलायचो.

शरवारी म्हणाली - आमही सुरक्षित वातावरणात शूटिंग केली

अशा वातावरणात आम्हाला एक मजेदार गाण्याच्या सिक्वेन्सचे शूटिंगही पूर्ण करावे लागले. आम्ही ते चांगल्याप्रकारे पूर्ण केले, इतके मोठे क्रू मेंबर असूनही आम्ही एका सुरक्षित वातावरणात शूटिंग केले. यासाठी मी यशराजची आभारी आहे.

सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला - पुन्हा काम करताना मजा आली

सुरुवातीला आम्ही शूटिंगमध्ये खूप मजा केली. पण अचानक कोरोना पसरला आणि शूटिंग थांबले. आम्ही शूट करु शकत नव्हतो किंवा एकमेकांना भेटूही शकत नव्हतो. मात्र नव्याने सर्वांबरोबर काम करण्यात मला खूप मजा आली.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.