नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल पर्यटन दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

स्थैर्य, मुंबई, दि.२८: नाशिकमधील ग्रेप पार्क, खारघरमधील एमटीडीसीच्या युथ हॉस्टेलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून युथ हॉस्टेल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.

पर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेल्या युथ होस्टेलचे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुन ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे खारघरमधील युथ हॉस्टेलमध्ये उपस्थित होते. युथ हॉस्टेलचे उद्घाटन झाल्यानंतर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.

आदिती तटकरे यांनी ४ सप्टेंबरला युथ हॉस्टेलची पाहणी केली होती. काही दिवसांतच खारघर युथ हॉस्टेल खुले केले जाईल, असे आश्वासन दिले होते. 

दरम्यान, नाशिकमध्ये एमटीडीसी ग्रेप पार्क आणि बोट क्लबचे उद्धाटनही यावेळी करण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे सत्यात उतरल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya