सोशल मीडियावर चॅलेंजचा ट्रेंड सुरू

 


स्थैर्य, सातारा, दि. २८ : सोशल मीडिया हे एक असे माध्यम झाले आहे की सर्वसामान्यांपासून ते बडय़ा नेतेमंडळी सिनेस्टार यांचं हक्काचे व्यासपीठ झाले आहे. या सोशल मीडियावर कोणता विषय चर्चेत येईल अन् सत्यात उतरेल हे कधीच सांगता न येणारे आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी होते हाताला काम नाही आणि दिवसतर पुढे धकलायचे आहेत. यासाठी काहींनी सोशल मीडियावर चॅलेंजचा ट्रेंड सुरू केला यामध्ये सर्वसामान्यांपासून अगदी उच्चभ्रू लोकांचाही यामध्ये सहभाग मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे.  


गेल्या काही दिवसांपूर्वी 'नथीचा नखरा' हे चॅलेंज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. यामध्ये उठावदार अनोख्या नथ घालून आपला फोटो सोशल मीडियावर टाकायचे होते.त्यांनतर साडी चॅलेंज रेसिपी चॅलेंज, फारमर चॅलेंज, बाप लेक चॅलेंज अन आता कपल चॅलेंज यांसारख्या अनेक चॅलेंजनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर दिवसेंदिवस कोणता हटके ट्रेड व्हायरल होईल सांगता येत नाही. अल्पावधीतच कपल चॅलेंज धुमशान घातले आहे. पती-पत्नीने एकमेकांच्या फेसबुक वॉलवर आठवणीतले फोटो शेअर करून स्पर्धेत बाजी मारली आहे. काहींनी फोटोला सकारात्मक कमेंट केल्या आहेत. नेमका हा ट्रेंड पेरत कोण? नेटिझन्स याला बळी कसे पडतात? हे न उमगलेलं कोडं आहे.  


काही दिवसांपूर्वीच नथीचा नखरा चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल झालं त्याचं काही महिलांनी डोक्यावर घेतलं टीकाटिप्पणी झाली मात्र कोरोनामुळे घरी बसून वैतागलेले नेटिझन्स सध्या प्रत्येक सोशल स्पर्धेत हिरीरीने भाग घेताना दिसून येत आहे. त्यात कपल चॅलेंज उडी मारली. सातारा शहरातील सर्व सामान्यांपासून ते अगदी उच्च पदस्थ अधिकाऱयांकडून ही जोडी ने काढलेले फोटो शेअर केले आहेत.


कपल चॅलेंजला सिंगल चॅलेंजची टक्कर!..अविवाहित असणाऱ्यांना या स्पर्धेत उडी घेताना आल्याने त्यांनी सोशल मीडियावर विनोद केले आहेत. लाखाची स्वप्ने पाहणाऱ्यांना असे हिणवू नये. लॉकडाऊन त्यात अशा स्पर्धा घेऊन दुःखावर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले गेले तर काही अविवाहित स्पर्धकांनी सिंगल चॅलेंज देऊन कपल चॅनेल ला टक्कर देण्यासाठी उडी मारण्याची दिसून येत आहे.


कोरोनाकाळात सोशल मीडियाचा आधार..सगळीकडे कोरोनाची दाहकता त्यात नोकरी धंदय़ाचे वांदे यामुळे निराशा पहायला मिळत आहे. त्यात सोशल मीडियामुळे विरंगुळा होवून जातो. नवनवीन येणारे चॅलेंज अन् त्यावर येणारे गमतीदार कमेंट वाचून तेवढाच आनंद मिळतो. या कोरोना काळात सोशल मीडियाचे महत्त्व वाढले असले तरी अतिरेक वापर हा घातक ठरु शकतो

रोहित साळुंखे, सातारा


 


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya