फलटणमध्ये "छत्रपती शिवाजी महाराज" कोरोना केअर सेंटर आजपासून सेवेत रुजू 

 

स्थैर्य, फलटण, दि.१७: मराठा क्रांती मोर्चा फलटण व महाराजा उद्योग समूह यांचे संयुक्त विद्यमाने "छत्रपती शिवाजी महाराज" कोरोना केअर सेंटर आज पासून कोरोना रुग्णांसाठी फलटण करांच्या सेवेत रुजू झालेले आहे, कोरोना रुग्णांसाठी सरकारने वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्वेता लादे, डॉ. नितीन राठोड व इतर वैद्यकीय आवश्यक स्टाफ उपलब्ध करून दिलेला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक व सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, जेष्ठ नगरसेविका सौ.मधुबाला भोसले, मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत, युवा उद्योजक रणजितसिंह भोसले, दैनिक पुण्यनगरीचे फलटण तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे-पाटील, दैनिक मुक्तागिरीचे उपसंपादक युवराज पवार, हणमंतराव जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post