राष्ट्रपती, पंतप्रधानांसह 10 हजार भारतीय व्यक्तींवर चीनची पाळत

 


स्थैर्य, दि. १४ :  लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकही गोळी न चालवता चीनने भारताविरोधात युद्ध पुकारले असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाला 'हायब्रिड वॉरफेअर' म्हटले जाते. चीनने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १० हजार व्यक्ती आणि संघटनांवर पाळत ठेवली आहे. चीनच्या या हेरगिरीमध्ये त्यांची झेन्‍हुआ डाटा इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी कंपनी लिमिटेड या बिग डेटा कंपनीने मदत केली आहे.


'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीन सरकारशी संबंधित असलेल्या झेन्‍हुआ कंपनीने भारतातील १० हजार व्यक्ती, संघटनांची हेरगिरी केली आहे. ही कंपनी बिग डेटाचा वापर करून 'हायब्रीड वॉरफेअर' आणि 'चीनच्या व्यापक प्रकल्पा'साठी काम करत आहेत. चीनच्या कंपनीने राजकारण, सरकार, व्यापार-उद्योग, तंत्रज्ञान, माध्यमे आणि नागरी चळवळीतील व्यक्ती, संघटना यांना लक्ष्य करतात. चीनच्या गुप्तचर संस्था, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांसोबत काम करते. ही चिनी कंपनी डिजिटल जगात आपल्या लक्ष्यावर बारीकपणे लक्ष ठेवते. यामध्ये दस्ताऐवज, पेटंट, नोकर भरतीची पदे आदीबाबतही माहिती ठेवली जाते.


अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांविषयीच्या डेटाबेस कंपनीने तयार केला असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. चीनने या कंपनीच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत, सरन्यायाधीश शरद बोबडे, भारताचे महालेखा परीक्षक, जवळपास ३५० खासदारांवरही पाळत ठेवली असल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजप, काँग्रेस, डाव्या पक्षांच्या निगडीत असलेल्या नेत्यांसह प्रादेशिक पक्षांचे नेत्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओदिशाचे नेते नवीन पटनाईक, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, 'आप'चे मनीष सिसोदिया आदींचा समावेश आहे. या व्यक्तीही चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.


ही चीन कंपनी एक दुसऱ्यांशी संबंधित असलेल्या माहितीचा डेटाबेस तयार करतात. संबंधित व्यक्तींच्या अथवा लोकांमध्ये नेमके काय वातावरण आहे, त्यांचा कल कसा आहे, याबाबतची माहिती जमा करण्याकडे असतो. यासाठी लक्ष्य असलेल्या व्यक्तीच्या पोस्टवर कोणत्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, किती लाइक्स, शेअर येत आहेत याचे विश्लेषण केले जाते. त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे त्या व्यक्तीच्या भौगोलिक स्थानाचीही माहिती घेतली जाते. अशा प्रकारची माहिती जमा करण्याचा उद्देश्य घातक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.