राजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये : प्रीतसिंह खानविलकर

 

स्थैर्य, फलटण, दि.३०: फलटण शहरात राजेगटाच्या मार्फत विविध विकास कामे जोरात सुरू आहेत. शहरांमध्ये भुयारी गटार योजनेचे काम त्यासोबतच भूमिगत विद्युत वाहिनीचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी गटारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात उपस्थित होत असतात. फलटण शहरामध्ये राजे गटामार्फत केलेल्या कामांचे श्रेय काही विरोधक घेत आहेत. तरी राजे गटाने केलेल्या कामांचे श्रेय विरोधकांनी घेऊन नागरिकांची दिशाभूल करू नये असे आवाहन युवा नेते प्रीतसिंह खानविलकर यांनी केलेले आहे.

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण नगर परिषदेच्या अंतर्गत विविध विकास कामे केली जात आहेत. नगरपरिषदेवर राजेगटाची सत्ता आल्यापासून फलटण शहराचा कायापालट करण्यामध्ये राजेगट यशस्वी झालेला आहे. फलटण शहरात सुरू असणार्यां विविध विकासकामांचे श्रेय विरोधकांनी न घेता विकासकामांमध्ये सत्ताधार्यांसोबत येता येत नसेल तर विरोध तरी करू नये असा टोलाही प्रीतसिंह खानविलकर यांनी लगावला आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya