सासरवाडीत येऊन सासर्‍याला मारहाण 

 

स्थैर्य, सातारा, दि. २५: पत्नी माहेरी गेल्याचा राग मनात धरून पतीने सासरवाडीत येऊन घरात घुसून सासर्‍याला मारहाण केली तर सासू व पत्नीला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना कोंडवे तालुका सातारा येथे घडली. याप्रकरणी संबंधित पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन नामदेव वायदंडे (रा. सैदापूर ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अर्जुन वायदंडे यांची पत्नी माहेरी कोंडवे येथे गेली होती. त्याचा राग मनात धरून अर्जुन हा कोंडवेतील आपल्या सासरवाडीत गेला. घरात घुसून त्याने सासरे पोपट विठोबा सकट (वय 63,रा. कोंडवे ता. सातारा), सासू आणि पत्नी यांना शिवीगाळ व दमदाटी केली तर सासरे पोपट सकट यांना पोटावर व पायावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी सकट यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अर्जुन वायदंडेवर तत्काळ गुन्हा दाखल केला.
Previous Post Next Post