सामान्यांना दिलासा:खासगी रुग्णालयात 10 हजारांपेक्षा जास्त दर आकारत असल्याने आता सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली घोषणा

 

स्थैर्य, मुंबई, दि.१५: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सामन्य नागरिकांना दिलासा मिळवा तसेच कोविड-19 वरील उपचार परवडावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राजेश टोपे यानी ट्विट करत म्हटले आहे की, 'कोविड-19 च्या निदानासाठी सिटीस्कॅन (HRCT)चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी 10 हजार पेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT)चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅन चे कमाल दर निश्चित करणे संदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.' असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ आहे. असे असताना अनेक रुग्ण हे कोरोनावर मात करुन घरीही परत येत आहे. दरम्यान अनेकांना रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिलं भरावी लागत आहे. हे लक्षात घेत राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले आहे. तसेच आता सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.