कोरोना: असा होता आठवडा

 स्थैर्य, सातारा, दि.६: कोरोना युद्ध

३० ऑगस्ट २०२०

आज ७ हजार ६९० रुग्ण बरे, १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के. 

आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे. सध्या १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर उपचार सुरू, नोंद झालेले मृत्यू २९६ 

३१ ऑगस्ट २०२०

आज ११ हजार १५८ रुग्ण बरे, ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के. 

आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे, सध्या १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू १८४. 

लॉकडाऊनच्या कालावधीत २२ मार्च ते ३० ऑगस्टपर्यंत कलम १८८ नुसार २,४५,९२९ गुन्ह्यांची नोंद, ३४,१८२ व्यक्तींना अटक. विविध गुन्ह्यांसाठी २३ कोटी ४७ लाख ७ हजार ५६४ रु. दंड. अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख १६ हजार ७९८ प्रवेशिकांचे वितरण. 

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करून परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता येणे शक्य व्हावे यारीतिने नियोजन करण्यात येत असल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची माहिती. 

मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची बैठक. यावेळी कृषी मंत्री श्री दादाजी भुसे उपस्थित. ठळक मुद्दे- कृषीविषयक स्टार्ट अप्स, शेतकरी कंपन्या आणि गटांच्या माध्यमातून विकेल ते पिकेल संकल्पना व्यावसायिकरीत्या राबवा, कृषी विभागाच्या इतर योजनांची सांगड घाला, यासाठी कालबद्ध आराखडा तातडीने तयार करा. 

विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्यामार्फत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा लक्षवेध. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नुकसान होऊ देणार नाही याचे श्री धोत्रे यांचे आश्वासन. 

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत १००० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सर्वात जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दर बीड जिल्ह्यात (२४ टक्के) असल्याची श्री टोपे यांची माहिती. 

१ सप्टेबर २०२०

आज १० हजार ९७८ रुग्ण बरे, १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के. आतापर्यंत ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे. सध्या १ लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू -३२० 
सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. 

२ सप्टेबर २०२०

आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे. आतापर्यंत ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के. आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान. आतापर्यंत सध्या २ लाख १ हजार ७०३ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू - २९२ 


लॉकडाऊनच्या कालावधीत २२ मार्च ते १ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,४७,०६६ गुन्ह्यांची नोंद, ३४,३३८ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी २३ कोटी ५९ लाख ७६ हजार ३६४ रु. दंड. अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख १८ हजार २३२ सुरक्षा प्रवेशिकांचे वितरण. 

अनलॉक - ४ मुळे निर्बंध शिथील झाल्याने विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटची वाढ झाली असल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती. 

महाराष्ट्रातील उद्योजकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने डॉ नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने उद्योजकांसोबत उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांची ऑनलाइन चर्चा. ठळक मुद्दे -ज्या उद्योजकांना तत्काळ उत्पादन सुरू करायचे असल्यास त्यांच्यासाठी महापरवाना योजना. यामुळे अठ्ठेचाळीस तासांच्या आत उद्योगांना परवाने मिळण्याची सुविधा. कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या नोकरीच्या समस्या सोडवण्यासाठी महाजॉब्स पोर्टल सुरू. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या काही जागांवर नवीन शेड बांधण्यास प्रारंभ, उद्योजकांना जमीन व बांधकामामध्ये पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही, सिडबी (स्माल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) संस्थेमार्फत लघु व सूक्ष्म उद्योजकांना मदत करण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची आढावा बैठक. सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांना यापुढे केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणी करणे आवश्यक असल्याची श्री सामंत यांची माहिती. 

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या वाढीसाठी, सुलभ वित्त पुरवठा व विकासासाठी काम करणाऱ्या सीडबी संस्थेसोबत उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. ठळक मुद्दे- या सामंजस्य करारांतर्गत सीडबीच्यावतिने उद्योग विभागात प्रकल्प व्यवस्थापन घटकाची स्थापना. त्यामार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विकासासाठी योजना / कार्यक्रमांची आखणी. भाग भांडवल सहाय्य, व्याज अनुदान, आजारी पडण्याच्या मागावर असलेल्या या घटकांना सहाय्य, विद्यमान घटकांचे मूल्यमापन करुन आवश्यकतेनुसार सहाय्य. 

३ सप्टेबर २०२०

आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे. आतापर्यंत ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के. आज १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान. आतापर्यंत २ लाख ५ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरु. नोंद झालेले मृत्यू - ३९१ 

मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्यामार्फत सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा. ठळक मुद्दे- पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब, कोरोनामुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे, कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने जनजागृती करण्याची गरज. एकेका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. चेस द व्‍हायरस मोहीम गांभीर्यपूर्वक राबवा. कंटेन्मेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला गती द्या. 

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत, राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे, उपस्थित. सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू करून 31 ऑक्टोबरपर्यंत निकालासह पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा, समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून दोन दिवसात शासनास कळवण्याची आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्याची राज्यपाल श्री कोश्यारी यांची सूचना. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या हस्ते आयुष इम्युनिटी क्लिनिक, होमिओपॅथी आयुर्वेद युनानीचे ऑनलाइन उद्घाटन. ठळक मुद्दे - कोविड-19 परिस्थितीमध्ये शक्ती नैसर्गिक पद्धतीने प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक संकल्पना समोर आली असून होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी पध्दती यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे श्री देशमुख यांचे प्रतिपादन. राज्यात सुमारे 650 आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु. 

४ सप्टेबर २०२०

आज १३ हजार २८९ रुग्ण बरे. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के. आज १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान. आतापर्यंत २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर उपचार सुरू, नोंद झालेले मृत्यू- ३७८ 

मुख्यमंत्री श्री श्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा. कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची श्री ठाकरे यांची घोषणा. ठळक वैशिष्ट्ये- मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवकामार्फत 2 कोटी 25 लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा हे आजार असणाऱ्या व्यक्तींचा शोध, उपचारासाठी संदर्भ सेवांची उपलब्धता. 

५ सप्टेबर २०२०

आतापर्यंत एकूण ६ लाख ३६ हजार ५७४ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.१ टक्के. आज १० हजार ८०१ रुग्ण बरे, १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान, आतापर्यंत २ लाख २० हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरु. नोंद झालेले मृत्यू- ३१२ 

माझे कुटुंब,माझी जबाबदारी” या राज्यस्तरीय अभियानाच्या अनुषंगाने मुंबईतील महापालिका उपायुक्त, वॉर्ड अधिकारी, डॉक्टर्स, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व पालिका अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची बैठक. ठळक मुद्दे- माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या राज्यस्तरीय अभियानाच्या माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य. अनलॉकनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही काळजीची बाब असली तरी पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर यावर खात्रीपूर्वक मात करता येणे शक्य. निर्देश - आगामी काळात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची संख्या वाढवा, पुढील दोन महिने अधिक खबरदारी घ्या. सणांच्या मालिकेत कोरोना साथ नियंत्रणाचे नियोजन करा, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून राबवण्यात येणारी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या. परप्रांतीय मजूर परत येत असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवा. ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडचे नियोजन करा. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीतजास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणा. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे 20 नव्हे तर 30 संपर्क शोधा, 48 तासांच्या आत हाय रिस्क संपर्काची चाचणी करा. कोविडपश्च्यात रुग्णांचे वर्गीकरण करा. त्यामुळे नेमकी उपाययोजना राबविणे सोपे जाईल. 

कोरोना सोबत जगताना एसएमएस(एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायजर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅण्डस्) चा अधिकाधिक वापर करावा लागेल, असे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे प्रतिपादनप. 

पुण्यातील विधानभवन सभागृहात पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा व नियोजनाबाबत बैठक. यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री प्रकाश जावडेकर, खासदार श्री शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे - पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित. ठळक मुद्दे - ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे श्री जावडेकर यांचे निर्देश. इतर मुद्दे- कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती करा. मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची मोहीम अतिप्रभावी करा. मेगाभरती अंतर्गत प्राप्त उमेदवारांच्या अर्जांची छानणी करुन कायमस्वरुपी रिक्त पदाची भरती प्रकिया सुरु. कोविडच्या अनुषंगाने तात्पुरती मनुष्यबळांची भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द. ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी टेली-एक्सरे सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु. आरोग्य सुविधा वेळेत मिळव्यात यासाठी 50 टक्के नवीन रुग्णवाहिकांची खरेदी. कोरोना रुग्णाला उपचारांती खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या देयकांचे लेखापरीक्षण आवश्यक. ऑक्सिजनच्या पुरवठ्याध्ये तुटवडा होणार नाही याबाबत विशेष लक्ष. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविड-19 च्या अनुषंगाने खासगी रुग्णालयांनी मोफत उपचार करण्याची तरतूद असल्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार न करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर दंड आकारणी करा. 

सामाईक प्रवेश परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ, दि. ८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणे शक्य असल्याची वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya