कोरोनाचे 40 लाखांवर रुग्ण; 13 दिवसांत 10 लाख रुग्ण वाढले, याच काळात अमेरिकेत 4.98 तर ब्राझीलमध्ये 4.64 लाख रुग्णच वाढले


स्थैर्य, सातारा, दि.५: देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सुमारे 40 लाख झाली आहे. शुक्रवारी 83,341 नव्या रुग्णांसह एकूण रुग्ण 39,36,747 झाले. शनिवार सकाळी ही संख्या 40 लाखांवर जाईल. 10 लाख रुग्ण गेल्या 13 दिवसांत वाढले. 10 लाख रुग्ण वाढण्याची ही जगातील सर्वाधिक गती आहे. अमेरिकेत या 13 दिवसांत 4.98 लाख रुग्ण वाढले, तर ब्राझीलमध्ये हा आकडा 4.64 लाख होता. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा देश असेल, जेथे संक्रमितांची संख्या 40 लाखांवर आहे. अमेरिकेने 21 जुलैला आणि ब्राझीलने 2 सप्टेंबरला हा आकडा ओलांडला आहे.


देशात गुरुवारी 11,69,765 लोकांची चाचणी झाली. तज्ज्ञांनुसार, आता या तपासणीची क्षमता आता वाढवून दिवसाला किमान १५-१७ लाख एवढी व्हायला हवी.


भारत बायोटेकच्या पहिल्या चाचणीत साइड इफेक्ट दिसला नाही
नवी दिल्ली | भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या (कोव्हॅक्सिन) मानवी चाचणीत पहिल्या टप्प्यात कोणताही साइड इफेक्ट दिसला नाही. सीडीएससीओने दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीला आता मंजुरी दिली आहे.

रशियाची लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा
मॉस्को | रशियाने स्पुटनिक व्ही नावाने काढलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा मेडिकल जर्नल द लॅन्सेटने केला आहे. लॅन्सेटने एका संशोधनाअंती निष्कर्षात हा दावा केला.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.