अन्न व नागरी पुरवठा खात्यात सहाजणांना कोरोना; भुजबळ ‘होम क्वॉरंटाईन’

 

स्थैर्य, मुंबई, दि.१२: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी-कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भुजबळ स्वत: होम क्वॉरंटाइन झाले असून त्यांचे कार्यालय एक आठवडा बंद राहणार आहे.

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वत: होम क्वारंटाईन झाले असून कार्यालयातील कर्मचा-यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.
Previous Post Next Post