प्रा. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी : देवेंद्र फडणवीस

 

स्थैर्य, नागपूर, दि.२२: आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक, नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे माजी प्रमुख प्रा. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

प्रा. भाऊ लोखंडे यांनी बौद्ध आणि दलित साहित्याच्या चळवळीत मोठे योगदान दिले. रशियातील बौद्धधर्म, मराठी साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव अशा अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले, व्याख्याने दिली. इतर देशांमध्येही त्यांची व्याख्याने बरीच गाजली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आणि कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता त्यावर उदबोधन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी स्वत:ला या कार्यात झोकून दिले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय, आप्तपरिवाराच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya