दिलदार नेता : जयेंद्रदादा चव्हाण

 


स्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा जिल्हा बॅँक असोसिएशनचे संचालक, जनता सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, माजी उपनगराध्यक्ष, पुण्यशील सुमित्राराजे नागरी सहकारी पतसंस्थेचे आणि ट्रस्टचे सस्थापक-चेअरमन, सातारा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संघटक,  जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांचा आज मंगळवार, दि. २९ रोजी वाढदिवस साजरा होत आहे.

सतत हसतमुख चेहऱ्याने सर्वांसमोर येणारा नेता म्हणून जर्येद्र चव्हाण यांची ओळख आहे. कोणतेही काम सांगा ज्याच्या शब्दकोशात 'नाही' हा शब्दच आढळणार नाही, असा नेता म्हणूनही जयेंद्र चव्हाण यांचे नाव संपूर्ण सातारकराना परिचित आहे. समाजकारण, राजकारण, सहकार, बँकिंग अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा जयेंद्र चव्हाण यांनी उमटवला आहे. राजकीय कारकिदींच्या सुरुवातीलाच त्यांना स्व. भाऊसाहेब महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. सलग दहा वर्षे नगरसेवक, सव्वा वर्षे उपनगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नगरपालिकेतील विविध खात्यांचा

सखोल, अभ्यास करून त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या वॉर्ड-बरोबरच सपूर्ण सातारा शहराचा विकास व्हावा यासाठी दूर-दृष्टीने निर्णय घेतले. श्री शाहू कलामंदिर, पाणी वितरण व्यवस्था, प्रभागातील रस्ते अशी असंख्य कामे त्यांनी केली. एखाद्या नगरसेवकाने कोट्यवधी रुपयांची कामे करण्याचे जयेंद्रदादांच्या रूपाने सातारा शहरात एकमेव उदाहरण आहे. सध्या सातारा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमध्ये दादांनी पूर्णवेळ वाहून घेतले आणि साताऱ्यातील नवीन पिढीसाठी एक भव्य क्रीडा दालन उभे केले. त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि कल्पकतेचा प्रभाव सातारा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्रतापगंज पेठेतील क्रीडांगणावर आपल्याला पहायला मिळतो. एकाच ठिकाणी अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट, जिम, शुटिंग रेंज, सिंथेटिक फुटबॉल मैदान, सुसज्ज लेडिज होस्टेलची इमारत त्यांनी उभी केली. या मैदानावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो विद्यार्थी आपल्यातील क्रीडा नैपुण्य वाढवण्यासाठी सराव करताना दिसतात. त्यामुळे शहरातील क्रीडापटू घडवण्याचे मोठे काम दादांच्या हातून होत आहे. दादांनी मराठा संस्थेच्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्यासाठी दिलेल्या योगदानाचे मोल कोणत्याच शब्दात करता येणार नाही. आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत धावून जाणारा, त्यांच्यासारखा धडाडीचा दुसरा मित्र सातारा शहरात नाही.


त्यांनी स्थापन केलेल्या पुण्यशील राजमाता सुमित्राराजे सहकारी पतसंस्थेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या सस्थेने स्थापनेपासून ऑडिट 'अ' वर्ग कायम राखत चौफेर प्रगती केली आहे. संस्थेला सलग दोन वर्षे सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाला आहे. पुण्यशील

सुमित्राराजे पतसंस्थेच्या आदर्श कामकाजामुळेच संस्थेला दोन शाखा उघडण्यास परवानगी मिळाली आहे. शाहपुरी आणि मंगळवार पेठ शाखेची जोरदार घोडदौड सध्या सुरू आहे. या संस्थेची स्थापना दि. ३ फेब्रुवारी २००३ रोजी झाली. संस्थेचे सर्व संचालक व सेवकांना संस्थेच्या कार्यात सहभागी करून घेऊन संस्थेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवला आहे. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाची भव्य आणि सुसज्ज स्वमालकीची इमारत त्यांनी उभी केली आहे. संस्थेचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत आहे. संस्थेत लॉकर सुविधा, वीज बिल भरणा केंद्रही आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व सेवा त्यांनी उभ्या केल्या आहेत.


शैक्षणिक क्षेत्रातही उत्तुंग कार्य त्यांनी केले आहे. सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये संघटक म्हणून काम करताना समाजातील शेवटच्या घटकाला अतिशय अल्प मोबदल्यात चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. या संस्थेचा विस्तार करून विद्यार्थ्यांना मुक्‍त शिक्षणाच्याही विविध सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. पत्रकारितेपासून शिक्षण व्यवस्थापनपदाच्या विविध कोर्सेसचा लाभ आज विद्यार्थी घेत आहेत. राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्राबरोबरच क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातही जयेंद्रदादा यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. क्रिकेट प्रशिक्षण, सातारा जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनद्वारे राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करून त्यांनी वेटलिफ्टिंग मधील खेळाडूंमध्ये चैतन्य आणले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे साताऱ्यात यशस्वी आयोजन करून त्यांनी हा खेळ साताऱ्यात

रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.


जयेंद्र चव्हाण यांनी २0१५ मध्ये पुण्यशील सुमित्राराजे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. आज या जेष्ठ नागरिक संघात १३0 सदस्य आहेत. ज्या वयात या लोकांना आधाराची गरज असते त्यांना दादांच्या रूपाने आधारवड मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व निसर्गाचा आनंद लुटता यावा म्हणून ते वर्षातून एकदा सहलीचे, आयोजनही करतात. या शिवाय त्यांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून दरवर्षी संपूर्ण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिर घेतात तेही मोफत. याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शनही त्यांना केले जाते. सकाळ व सायंकाळी त्यांना सुरक्षितरित्या फिरता यावे यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयात त्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, गप्पा गोष्टी करण्याचे ते एक चांगले ठिकाण झाले आहे. ज्येष्ठांप्रती त्यांचा असलेले दृष्टिकोन पाहता शेकडो ज्येष्ठांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठांमध्ये खूप उत्साह असतो. ते त्यांच्या वाढदिवसाला केक कापून हा आनंद साजरा करतात.


यावर्षी करोनामुळे पसरलेल्या महामारीला शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दादांनी संस्थांमार्फत साहित्य गोळा, करून ते गोरगरिबांना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. जयेंद्रदादा हा नुसता नावाने दादा नाही तर त्याच्या वागण्यातही दादा

उपाधीची अदब आहे. आपल्याकडे मोठ्या भावाला दादा म्हणतात आणि जर्येंद्रदादा माझ्यासारख्या अनेक मित्रांचा त्या नात्यानेच दादा आहे. साताऱ्यातील अनेकांनी त्यांच्यातील दिलदारपणा अनुभवला आहे. दिलदार नेता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणूनच दादांकडे पाहिले जाते. कोणतीही अडचण सांगा दादाचे उत्तर 'मी करतो', असे तयारच असते. बघतो, करूयात, सांगतो अशी उत्तरे तो कधीच देत नाही आणि हा अनुभव आमच्यासारखाच मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्यावेळी घेतला आहे. दादांचे कार्यालय, गाडी, फार्म हाऊस आणि घर सर्वांसाठी चोवीस तास खुले असते. कोणत्याही कामासाठी दादा तत्पर असतो.


साताऱ्यात जो लाखोंचा मराठा मोर्चा झाला तो यशस्वी करण्यात दादांचा मोठा वाटा होता. पोलिसांच्या दिशेने फेकलेले दगडगोटे स्वत:च्या अंगावर घेण्यातही तो पुढे राहिला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा असलेला मित्र, दिलदार नेता शतायुषी व्हावा, अशाच त्याला मनापासून शुभेच्छा आहेत.

दिलीप म्हेत्रे, उद्योजक

Previous Post Next Post