मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात मोफत डाळीचे वाटप सुरू


स्थैर्य, मुंबई, दि.३: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) मोफत डाळीचे माहे जुलै 2020 व माहे ऑगस्ट 2020 या महिन्याकरीता वितरण सुरू करण्यात आले आहे. ही योजना माहे नोव्हेंबर, 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे एकूण पाच किलो मोफत अन्नधान्याचे माहे जुलै 2020 या महिन्याचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच माहे ऑगस्ट 2020 या महिन्याचे वाटप सुरु आहे. 

डाळीचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर डाळ प्राप्त करुन घ्यावी. असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.