नोकरदारांसाठी जिल्हा बॅँकेचे एक पाऊल पुढे : नितीन माळवे

 

शिक्षकांचा सत्कार करताना नितीन माळवे, गणेश खाडे आदी (छाया :समीर तांबोळी)

स्थैर्य, कातरखटाव, दि. ११ : शेतकरी हिता  बरोबरच शासकीय  पगारदाराची अडचण दूर करण्यासाठी जिल्हा बँकेने एक पाऊल पुढे टाकत  पगार तारण कर्ज योजना सुरू केली असून याचा नोकरदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाखा प्रमुख नितीन माळवे यांनी केले.


कातरखटाव  (ता.खटाव ) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विकास अधिकारी धनाजी खाडे, रोखपाल  गणेश खाडे, सुधीर खाडे,रुपाली सानप, भाऊसाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


माळवे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना थेट बांधा पर्यंत पोचवण्याचे काम बँकेच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकरी हित पाहत असताना  शासकीय नोकरदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी बँकेने पगार तारण कर्ज सुरू केले आहे.यामुळे  नोकरदारांना अडचणींवर मात करता येणार आहे. सॅलरी पॅकेज ग्रहसंकल्प,शिक्षणीक कर्ज एटीएम,विमा,मोबाइल बँकिंग आदी बाबत ही माहिती देण्यात आली.


यावेळी सुहास शिंगाडे,महेश नौगण,विजय हांगे,संजय खोत,मनोहर तांबे,हरिश्चंद्र मोहिते,याकूब नदाफ, सागर माने,अमर भागवत, अनिता वरुडे, विद्या पाटील, दीपमाला खोत, शिला मंडले  आदींसह शिक्षक उपस्थित होते. भाऊसाहेब मोरे यांनी आभार मानले.

    Previous Post Next Post